केवळ १०० रुपयात डायलिसीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:32+5:302021-06-16T04:13:32+5:30
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथील पावन भूमिमध्ये कोठारी चैरिटेबल ट्रस्टला नागरिकांची आरोग्य विषयक सेवा करण्याची संधी मिळाली ...

केवळ १०० रुपयात डायलिसीस
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथील पावन भूमिमध्ये कोठारी चैरिटेबल ट्रस्टला नागरिकांची आरोग्य विषयक सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी द्वारा संचालित पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलेसिस व डाइग्नोस्टिक सेंटर, जेजुरी येथे संस्थानच्या सहकार्याने गरजू व आर्थिक दुर्बल लोकांकरिता फक्त १०० रुपयात डायलेसिस ट्रीटमेंट डायलायज़र व ट्यूबिंग सहित उपलब्ध करण्यात आली आहे. या योजेनेचा सर्व पेशंटला लाभ दिला जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन शकुंतला कोठारी आणि अरुणा बनवट यांच्या द्वारे करण्यात आले. कार्यक्रमास श्री मल्हार देव संस्थान जेजुरीचे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे, तसेच विश्वस्त मंडळाचे ॲड. अशोकराव संकपाळ, शिवराज झगड़े, पंकज निकुड़े-पाटिल, मुख्य अधिकारी राजेन्द्र जगताप, व्यवस्थापक सतिष घाडगे, श्री गुरु गौतम ट्रस्ट चे संस्थापक सतिष बनवट तसेच शांतिलाल बोरा, नेमीचंद सोलंकी, किशोर छोरिया, कोठारी चैरिटेबल ट्रस्टचे संचालक प्रफुल्ल कोठारी आणि मितेश कोठारी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.