कमला नेहरू रुग्णालयात मिळणार डायलिसीस सुविधा
By Admin | Updated: February 2, 2015 02:35 IST2015-02-02T02:35:19+5:302015-02-02T02:35:19+5:30
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये केवळ ४८० रुपये इतक्या माफक दरामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे

कमला नेहरू रुग्णालयात मिळणार डायलिसीस सुविधा
पुणे : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये केवळ ४८० रुपये इतक्या माफक दरामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिका आणि लायन्स क्लब आॅफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे. किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नियमित डायलिसीस करून घ्यावे लागते. खासगी हॉस्पिटलमध्ये ही सेवा अत्यंत महागड्या दरात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कमला नेहरू रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत या रुग्णालयामध्ये तातडीची वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना याचा चांगला उपयोग होऊ शकेल.