मकर संक्रातीनिमित्त मतदारांशी संवाद
By Admin | Updated: January 16, 2015 03:04 IST2015-01-16T03:03:21+5:302015-01-16T03:04:57+5:30
जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारीला मतदान होत आहे. प्रचारासाठी अवघा दोनच दिवसांचा अवधी उरला आहे

मकर संक्रातीनिमित्त मतदारांशी संवाद
पिंपरी : जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारीला मतदान होत आहे. प्रचारासाठी अवघा दोनच दिवसांचा अवधी उरला आहे. संक्रांतीच्या सुटीचे औचित्य साधून आरपीआय आणि काँग्रेसच्या उमेदवारांनंी डीलक्स चौकात जाहीर सभा घेतल्या. तर शिवसेनेच्या व अन्य उमेदवारांनी पदयात्रांद्वारे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्राधान्य दिले.
महापालिकेच्या जिजामाता प्रभाग क्रमांक ४३ अ च्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी दोन अपक्ष असून, अन्य उमेदवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आरपीआय या प्रमुख पक्षांचे आहेत. शिवसेनेचे सुनील चाबुकस्वार, काँग्रेसचे संपत ओव्हाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण टाक, तसेच आरपीआय आठवले गटाचे अर्जुन कदम हे प्रमुख पक्षांचे चार उमेदवार या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर राजू भालेराव आणि अजय लोंढे हे दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.(प्रतिनिधी)