धवल शहा आदर्श व्यापारी पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST2021-02-16T04:11:26+5:302021-02-16T04:11:26+5:30
पुणे : एस. एम. जोशी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, पिंपरी-चिंचवड ...

धवल शहा आदर्श व्यापारी पुरस्काराने सन्मानित
पुणे : एस. एम. जोशी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार गिरीश बापट, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा यांना आदर्श व्यापारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जयराज ग्रुप पुण्यातील नामवंत व्यवसाय ग्रुप म्हणून प्रसिद्ध आहे. जयराज ग्रुपला आत्तापर्यंत अनेक मनाच्या पुरस्कारांनी गौरविले आहे. धवल शहा हे जयराज ग्रुपच्या तिसऱ्या पिढीच्या रूपाने व्यवसायाचे समर्थपणे नेतृत्व करीत आहेत. जयराज ग्रुप हा व्यवसाय समूह व्यापार क्षेत्रात एका उंचीवर आहे त्याची धुरा धवल शहा हे यशस्वीपणे सांभाळीत आहेत. पुण्यातील व्यापारी विश्वात त्यांचा युवा उद्योजक म्हणून नावलौकिक आहे. या पुरस्काराने त्यांच्या या नावलौकिकात नक्कीच भर पडेल यात शंका नाही.