शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 21:02 IST

आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे.

ठळक मुद्देपुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादरकिल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव खांबटाकी, ऐतिहासिक अवशेष

पुणे: महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गवैभवाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या दुर्गवैभवाला अभिमान व पराक्रमाची एक ऋणानुबंधाची झालर आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत दूरवर विखुरलेली ही दुर्गसंस्कृती गिर्यारोहकांसह पर्यटकांना वारंवार खुणावत असते. मात्र, आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील एका गिर्यारोहकाला यश आले आहे. ओंकार ओक असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला असून, गडावरील ढवळेश्वर मंदिर स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुप्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी २ मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहुन - वनपुरी - सिंगापूर- पारगाव चौफुला- वाघापूर- आंबळे असा आहे. तर आंबळे गावातून गडाच्या अर्ध्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दुसरा मार्ग पुणे - सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब गावमार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो. इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या अस्सल संदर्भपुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला आहे. त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले आहे. स्थानिक गावकºयांना  हा ढवळगड माहित आहे. मात्र, त्याच्यावर किल्ला या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्यामुळे ढवळगड अप्रकाशितच राहिला. त्यामुळे गिर्यार्रोहक किल्ल्याबाबत अद्याप अनभिज्ञच होते. या ढवळगडच्या स्थान निश्चितीबद्दल सांगताना ओक म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात काही मित्रांबरोबर आंबळे गावाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो तेव्हा एका डोंगरावर तटबंदी आढळून आली. त्यामुळे उत्सुकता वाढली त्या ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता तटबंदी, भग्न दरवाजा, पाण्याची खोदीव टाकी,मंदिर, बुरुज, चुन्याच्या घाण्याचे अवशेष,मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले. पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने तसेच गॅझेटीयरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने अधिक खोलात शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यात ओक यांना पुण्यातील डॉ. सचिन जोशी या इतिहास अभ्यासकाचे बहुमोल योगदान लाभले आहे. याचप्रकारे यापूर्वी म्हणजे २०१२ मध्ये हेमंत पोखरणकर आणि राजन महाजन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लोंजा या किल्याची स्थाननिश्चिती केली होती. ओक व डॉ. जोशी यांनी शनिवारी (१९ मे) रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादर केला. ..................पुण्यात आल्यावर डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन याबद्दल सांगितले तेव्हा जोशी यांनीही या शोधमोहिमेत सहभागी होत पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. आम्ही दोघांनी पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली. किल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव व खांबटाकी, मेटाचे अवशेष, चुन्याच्या घाण्याचे अवशेष इत्याही ऐतिहासिक अवशेष असून किल्ला या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आढळून आल्या. त्यामुळे ढवळगड हाच ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख असलेला किल्ला असल्याचे सिद्ध होऊन त्याची स्थाननिश्चिती करण्यात आली. - ओंकार ओक  

टॅग्स :PurandarपुरंदरFortगड