शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पुण्याच्या देवयानी करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व

By श्रीकिशन काळे | Updated: January 17, 2025 15:17 IST

ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या शिष्टमंडळाने निवडलेल्या दोन भारतीयांमध्ये देवयानी यांचा समावेश

पुणे : येत्या २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूईएफ) च्या वार्षिक बैठकीत पुण्यातील तरुण उद्योजिका व ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती हबच्या सदस्या असलेल्या देवयानी पवार यांची निवड करण्यात झाली आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या जगभरातील ५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या २ भारतीयांपैकी देवयानी पवार या एक आहेत हे विशेष. त्यामुळे पुणेकर म्हणून त्यांचे कौतुक होत आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक उपक्रम असून या अंतर्गत जगभरातील युवक हे आपापल्या भागातील स्थानिक, प्रादेशिक यांबरोबरच जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. आज जगभरात ग्लोबल शेपर्स कम्युनिटीचे ५०० हून अधिक स्थानिक सक्रीय विभाग आहेत. यापैकीच एक असलेल्या बारामती विभागात सातत्याने सामाजिक, नैसर्गिक व हवामान बदल, आरोग्यसेवांविषयक जागरूकता, पुनर्वापर आदी विषयातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामासाठी कार्यरत असेलेल्या देवयानी पवार यांची जगभरातील ६०० अर्जदारांमधून या परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.

देवयानी यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये बारामतीजवळील जंगलामध्ये वनविभागाच्या मदतीने ४ हजारहून अधिक देशी वृक्षांची लागवड करणे, बारामती विभागाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये महिला व मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करणे, ५०० हून अधिक ग्रामीण महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविणे, ग्रामीण पार्श्वभूमीच्या ४ हजारांहून अधिक तरुणांना कौशल्याधारीत प्रशिक्षण देणे याबरोबरच कौशल्य विकास, कचरा व्यवस्थापन, रक्तदान मोहीम, मानसिक आरोग्यबद्दल जनजागृती, वृद्ध नागरीकांसाठी आरोग्य सेवा पुरविणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल बोलताना देवयानी पवार म्हणाल्या, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी ही मी माझा सन्मान समजते. दावोसच्या या भेटीमध्ये मला जागतिक नेत्यांसोबतच सकारात्मक काम करीत समाजात बदल घडविणाऱ्या अनेकांना भेटण्याची आणि त्यांसोबत नेटवर्किंग करण्याची संधी मिळेल. याबरोबरच या परिषदे दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक असलेले क्लॉस श्वाब यांसोबत होणाऱ्या एका विशेष सत्रासाठी देखील मी उत्सुक आहे. या व्यासपीठाचा उपयोग  स्थानिक पातळीवर भारतासाठी,आणि माझ्या सहकारी हब्ससाठी नव्या कल्पना आणि प्रगतीशील उपक्रम राबवण्यासाठी मी करणार आहे."

दरवर्षी जानेवारी महिन्यात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूईएफ)ची वार्षिक बैठक आयोजित करण्यात येत असते. जागतिक व्यवसाय, विविध देशांतील सरकारे, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचे गट सध्याच्या काळातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. कोलॅबोरेशन फोर दी इंटेलिजंट एज (प्रगत युगासाठी सहयोग) ही या वर्षीच्या वार्षिक सभेची संकल्पना आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र