शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनी अनुभवला देव-दानव युद्धाचा थरार; खेडमधील कोयाळी भानोबाची येथे उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:09 IST

श्री. भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी हजेरी लावली होती. 

ठळक मुद्देदेव आणि दानवांचे युद्ध पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी लावली हजेरी यात्रेदरम्यान आळंदी व चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत तैनात करण्यात आलाचोख बंदोबस्त

शेलपिंपळगाव : ऐशी भानोबाची ख्याती !                    प्रतिवर्षी येती उत्सवासी !!                    भक्तिभावे पुजता त्यासी !                    दु:ख दैन्य निवारी !!असाच प्रत्यय श्री. क्षेत्र कोयाळी भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविक भक्तांनी अनुभवला. श्री. भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय आयोजित उत्सवामध्ये पहिल्या व दुसऱ्या दिवशी खेळले जात असलेले देव आणि दानवांचे युद्ध प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी हजेरी लावली होती. कोयाळीत श्री. भानोबा देवाच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. यावेळी देवाच्या स्वागत सभारंभाला नागरिकांची संख्या मोठी लक्षणीय होती. कोयाळी येथे रविवारी आणि सोमवारी देव-दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी तसेच श्री. भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसात हजारो भाविकांनी हजेरी लावली. तत्पर्वी, आज पहाटे श्री. भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडे अकरा ते एक यावेळेत देव-दानव युद्ध झाले. देवाची महारती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबरीतून सुरुवात झाली. उत्सवात कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजन कार्याक्रमची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती.

मंगळवारी (दि. २१) सकाळी ६ ते ७ श्री. भानोबा देवाचा ओलांडा, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ श्री. भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल. त्यांनंतर कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. भानोबाच्या तीन दिवसीय उत्सवात आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे  आदींसह विविध राजकीय पक्षाचे मुख्य पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

तीन दिवसीय चाललेला हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी व चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र