शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे संकट टळावे म्हणून जेजुरी गडावर भक्तांचे कुलदैवताला साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 12:26 IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३१वर पोहचली असून पुण्यात त्याचे १६ रुग्ण आढळून आले आहे.

ठळक मुद्देसामाजिक, राजकीय, धार्मिक सोहळे यांना परवानगी नाकारण्याचे आदेश

जेजुरी: जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.त्यात चीनसह अन्य देशासह अनेक नागरिकांचा दगावले आहे. देश विदेशातील सरकारी प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी यांच्याकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भावासाठी  रोखण्यासाठी अनेक प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.राज्य सरकारकडून देखील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह यांच्या बंदसोबतच सामाजिक, राजकीय, धार्मिक सोहळे यांना परवानगी नाकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र दिवसेंदिवस तो कमी होण्याऐवजी त्याचा संसर्ग वाढत आहे. मात्र, जागतिक पातळीसह राज्यावरील कोरोनाचे संकट टळावे यासाठी महाराष्ट्राच्या कुलदैवताला सोमवारी साकडे घालण्यात आले.   महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला भक्तांनी आज महापूजा, दुग्धअभिषेक घालून कोरोनाचा प्रसार फैलाव होऊ नये. हा आजार नष्ट व्हावा, त्याच्यावर लवकरात लवकर लस निर्माण व्हावी, जगभरातून कोरोनाचा समूळ उच्चाटन व्हावे म्हणून मल्हार भक्त गण पुणे, नित्य वारकरी खांदेकरी,मानकरी, सेवेकरी जेजुरी, श्री ओम भक्तगण पुणे  यांच्या वतीने साकडे घालण्यात आले. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३१वर पोहचली असून पुण्यात त्याचे १६ रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव रोखण्याची आव्हान प्रशासनासह सर्वांच्याच समोर आहे. 

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस