शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बारामतीच्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 12:17 IST

या घटनेची माहिती समजताच बारामतीवर शोककळा पसरली आहे...

बारामती : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बारामती येथील भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांच्या बोलेरो गाडीचा गुरुवारी(दि १२) पहाटे  नोएडाजवळ अपघात झाला. बारामतीतील चार, तर कर्नाटक येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच बारामतीवर शोककळा पसरली आहे.

बस आणि बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील एकूण ५० प्रवाशी निघाले होते. यापैकी बोलेरो गाडीत सात जण प्रवास करीत होेते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. यात एकूण पाचजणांचा मृत्यु झाला. बारामतीच्या चौघाजणांचा मृत्यु झाला.

यामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार, अशी या चौघाजणांची नावे आहेत. यामध्ये रंजना पवार या उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे खासगी स्वीय सहायक सचिन पवार यांच्या मातोश्री आहेत. याशिवाय स्वयंपाक करणाऱ्या निवंतण मुजावर (रा.चिकोडी,कर्नाटक) या महिलेचा मृत्यु झाला आहे. तसेच सुनीता राजु गस्ते(बेलगाव,कर्नाटक ) या जखमी झाल्या आहेत. अपघातग्रस्त गाडीचे चाालक नारायण कोळेकर(रा.फलटण) हे गंभीर जखमी आहे.

गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान हा गंभीर अपघात झाल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप या प्रवाशांनी अपघातग्रस्तांना अपघात झाल्यानंतर मदत केली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. तसेच अपघात ग्रस्तांना मदतीसाठी दिल्लीमध्ये यंत्रणेबरोबर पवार यांनी स्वत: संपर्क साधला आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAccidentअपघातdelhiदिल्ली