शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीवर शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी, शिवसेना कोणाची हे शिंदेंनी दाखवून दिले- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 13:42 IST

पुण्यात पत्रकारांशी बोलत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका...

पुणेमी काल नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला होतो. त्यामुळे दोन्ही भाषण मी ऐकले नाहीत. मात्र, रात्री शिंदे यांचे भाषण ऐकले. व्हिडिओ बघितले. त्यातून बीकेसीवरील गर्दीतून शिंदे यांनी हे दाखवून दिले की खरी शिवसेना नेमकी कोणाची आहे. शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी तेथे होती. उध्दव ठाकरे यांच्या भाषणात शिमग्याच्या पलीकडे काहीच नव्हते. त्यावर सुज्ञ प्रतिक्रिया देत नाहीत, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

खरी शिवसेना कोणती यावरून दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळव्यांवरून राजकीय घमासान सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचीच स्क्रिप्ट भाषणासाठी वापरली अशी टीका होत आहे. यावर आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ही स्क्रिप्ट भाजपची होती असे म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उध्दव ठाकरे यांचे भाषण हे शिमगा होते आणि सुज्ञ लोक त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, अशी शेलक्या भाषेत टीका त्यांनी या वेळी केली. 

'उध्दव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत'-

शिंदे काल जे बोलले ती भाजपचीच स्क्रिप्ट होती अशी टीका होत आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, "असे बोलणाऱ्या लोकांनी आता आपला स्क्रिप्ट रायटर बदलावा. एकनाथ शिंदे हे विकासावर बोलले, पुढे सरकार म्हणून काय करणार आहोत याबाबत ते बोलले. मात्र, यापूर्वी उध्दव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. ते पूर्णवेळ पक्षप्रमुख म्हणूनच बोलले."

'सावरकरांना शिव्या दिल्याने आज ही स्थिती'-

शिंदे माझ्यासोबत बसलेले असताना त्यांना झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा असे का वाटले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती, यावर फडणवीस म्हणाले, "अजित पवार काय बोलले मला माहित नाही पण मूळ शिवसेनेचा विचार बाजूला ठेऊन सावरकरांना शिव्या द्यायच्या, दाऊदच्या हस्तकांसोबत बसल्यानेच ठाकरे यांची आज ही अस्वस्था झाली."

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे