शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत; राजभवनाकडून चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 15:49 IST

राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या स्थापनेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा

सोमेश्वरनगर : राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या स्थापनेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत असा दावा केला जात आहे. मात्र बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेले असतानाही राजभवनातून ते भेटलेच नसल्याची खोटी माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.                   सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस कोणत्या तारखेस राज्यपालांना भेटले याची माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी मागविली होती. यावर राजभवन कार्यालयाने उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत भेट झाल्याची नोंदच राजभवन दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २८ जुन २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या विवीध वृत्तपत्रात व न्युज चॅनेलवर प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानाही राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस भेटलेच नसल्याची माहिती दिली आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याचे खोटे असल्याचा दावा नितीन यादव यांनी केला आहे.         दुसरीकडे राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी ज्यांना निमंत्रण दिले होते. त्याची माहिती तसेच एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती राज्यपालांनी अद्यापही त्यांच्याजवळच वैयक्तिक राखुन ठेवली आहे. त्यांच्याच राजभवन कार्यालयासही उपलब्ध करुन दिली नसल्याचे यादव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही माहिती राज्यपालांनी स्वतःजवळच ठेवण्याचे कारण काय? राज्यपालांना ही माहिती देताना नेमकी कशाची भिती वाटतेय हे वेगळे सांगायची गरज नसल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSocialसामाजिकPoliticsराजकारण