शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

झोपडपट्टीतील ‘विकास’ बनला सीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST

पुणे : झोपडपट्टीमधील खुराडेवजा खोली... वडील मोलमजुरी करणारे तर आई धुणी-भांडी करणारी... अठरा विश्वे दारिद्रय अन् अशिक्षितपणाचा वारसा... आसपास ...

पुणे : झोपडपट्टीमधील खुराडेवजा खोली... वडील मोलमजुरी करणारे तर आई धुणी-भांडी करणारी... अठरा विश्वे दारिद्रय अन् अशिक्षितपणाचा वारसा... आसपास गुन्हेगारी आणि सततची भांडणे... अशा विपरीत परिस्थितीमध्ये स्वत:च्या जिद्दीने एका तरुणाने यश खेचून आणले आहे. सहकारनगरच्या सिद्धार्थ वसाहतीमधील ‘विकास’ सीए झाला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करून अडचणींचे डोंगर पार करता येतात हेच त्याने दाखवून दिले आहे.

सहकारनगर येथील सिद्धार्थ वसाहत नावाची झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीमध्ये अर्जुन लोखंडे आणि त्यांची पत्नी रेखा हे कष्टकरी दाम्पत्य राहते. त्यांना विकास आणि हर्षद ही दोन मुले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज जवळील खंडाळे गावामधून लोखंडे पोटाची खळगी भरण्यासाठी १९८९ साली पुण्यात आले. सुरुवातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह केला. रस्त्याच्या कडेला दुकानांसमोरील मोकळ्या जागेत झोपायचे आणि तेथेच गॅरेजमध्ये काम करायचे असा शिरस्ता अनेक वर्षे चालला.

त्यानंतर, झोपडपट्टीत एक छोटी झोपडी मिळाली. तेथेच संसार सुरू झाला. आपल्या मुलांनी शिकावे, साहेब बनावे, त्यांना कष्टाची कामे करावी लागू नयेत ही भावना मनात ठेवून दोघे पती पत्नी दिवसरात्र मेहनत करीत होते. आई-वडिलांचे कष्ट पाहून विकासच्या मनाला वेदना होत. आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, त्यांचे कष्ट दूर करून त्यांना सुखाचे चार दिवस दाखवावेत, असे त्याला सतत वाटायचे.

झोपडपट्टीतल्या त्या छोट्याश्या खोलीत त्याचा अभ्यास सुरू असायचा. सीए व्हायचे म्हणून त्याने नाना पेठेतील एका सीएकडे नोकरी करायला सुरुवात केली. अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. दोन वेळा त्याला अपयशही आले. जिद्दीने पुन्हा परीक्षा दिली आणि बाजी मारली. त्याच्या या यशामुळे आईवडील आनंदीत असून झोपडपट्टीतही त्याच्या यशाचे दाखले दिले जाऊ लागले आहेत. वस्तीमधील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बॅनर लावून त्याचे कौतुक केले आहे. त्याच्या घरी जाऊन सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सत्कार करू लागले आहेत. मुलाचे हे कौतुक बघून आईवडीलांचे डोळे मात्र कौतुकाने भरून येत आहेत.

====

आमच्या मुलाने आमच्या कष्टाचे चीज केले. आम्ही धुणीभांडी, मोलमजुरी करून मुलांना शिकविले. त्याने हार मानली नाही. गरिबी, झोपडपट्टीतलं जगणं, हालअपेष्टा सहन करुनही त्याने हे यश मिळविले त्याचा खूप अभिमान वाटतो. समाजात त्याने आमची मान गर्वाने उंचावली आहे. आमच्या जगण्यांचं सार्थक झालं.

- अर्जुन व रेखा लोखंडे (आई-वडील)

====

आई-वडिलांनी प्रचंड कष्ट केले. गावाकडून पुण्यात केवळ पोट भरण्यासाठी पुण्यात आल्यानंतरही त्यांनी आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. घरची परिस्थिती पाहून कधीकधी शिक्षण सोडून नोकरी करावी असे वाटत होते. पण, आई-वडील सतत प्रेरणा द्यायचे. त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याचे मी ठरविले होते. मला मिळालेले यश ही त्यांच्या कष्टाची पुण्याई आहे. मी सीए झालोय यावर अजूनही विश्वास बसत नाही.

- विकास अर्जुन लोखंडे