पालिका कर्मचारी वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा ‘विकास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:29+5:302021-01-08T04:26:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेच्या कर्मचा-यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेने धोरण तयार केले आहे. परंतु, बीओटी तत्वावर पुनर्विकास ...

'Development' of people's representatives through redevelopment of municipal staff colonies | पालिका कर्मचारी वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा ‘विकास’

पालिका कर्मचारी वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा ‘विकास’

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पालिकेच्या कर्मचा-यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेने धोरण तयार केले आहे. परंतु, बीओटी तत्वावर पुनर्विकास करण्यास रहिवाशांचा विरोध असून या वसाहतींच्या विकासामागील लोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हेतूंविषयी कर्मचाऱ्यांना शंका आहे. ‘बिल्डर लॉबी’ लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन रहिवाशांना बेघर करण्याच्या योजन आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

पालिकेच्या कर्मचा-यांच्या वसाहतींचा विकास केला जाणार आहे. बहुतांश वसाहतींमधील इमारती मोडकळीस आल्या असून याचे स्ट्रक्चरल ऑडीटही करण्यात आलेले आहे. या इमारती अत्यंत धोकादायक असून केव्हाही पडू शकतील अशा स्थितीत आहेत. पालिकेने या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणिा त्यांचे सहकारी असलेले बांधकाम व्यावसायिकांचे हित साधणारे प्रस्ताव आणण्यात आल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला.

शिंदे यांनी सांगितले की, सर्वपक्षीय नेत्यांसमोर प्रशासनाने प्रस्ताव ठेवले असले तरी कित्येक महिन्यांपासून यावर चर्चाच झालेली नाही. जाणिवपूर्वक पक्षनेत्यांच्या मान्यतेचा पायंडा पाडला जात आहे. या वसाहती मोक्याच्या जागी असून त्यामुळेच बांधकाम व्यावसायिकांचा त्यावर डोळा आहे. पुनर्विकास करताना रहिवाशांचे मत, हित लक्षात घ्यावे अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: 'Development' of people's representatives through redevelopment of municipal staff colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.