पर्वतीच्या विकासासाठी स्वबळावर लढणार
By Admin | Updated: September 7, 2014 00:19 IST2014-09-07T00:19:05+5:302014-09-07T00:19:05+5:30
गेल्या काही वर्षात पर्वती मतदारसंघातील नागरिकांनी अनेक राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराला संधी देऊन पाहिली. परंतु, प्रत्येक आमदाराने नागरिकांची निराशा केली.

पर्वतीच्या विकासासाठी स्वबळावर लढणार
पुणो : गेल्या काही वर्षात पर्वती मतदारसंघातील नागरिकांनी अनेक राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराला संधी देऊन पाहिली. परंतु, प्रत्येक आमदाराने नागरिकांची निराशा केली. त्यामुळे पर्वती मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका युवा नेते सचिन तावरे यांनी मांडली. त्या वेळी उपस्थित कार्यकत्र्यानी टाळ्य़ांचा कडकडाट करीत हात उंचावून भूमिकेला पाठिंबा दर्शविला.
पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या मेळाव्यात तावरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्या वेळी मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांसह वारकरी संप्रदाय मंडळाचे सदस्य, स्वामिनी महिला मंचाच्या सदस्य, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवती मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाल्हेकर, रमाकांत वाघमारे, सीमा साळुंखे, बापू खलाटे, माधवी चांदेकर व शिवाजी माने आदींनी मनोगत व्यक्त करताना सचिन तावरे यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला.
तावरे यांनी ‘एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे.
सावध..असा तुफानाची हीच सुरुवात आहे,’ या कवी नारायण सुव्रे यांच्या काव्यपंक्तींनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, ‘‘पर्वती मतदारसंघात लहानाचा मोठा होताना इथले जाणकार व गुरुजानांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळाले. माङयाकडे कोणतेही आर्थिक सत्तेचे पद नसताना शहरातील हजारो युवकांची साथ आजही मिळत आहे. आजच्या मेळाव्यात जमलेल्या युवकांच्या उत्साहावरून वेगळे सांगण्याची गरज नाही. पर्वती मतदारसंघातील माझी वडीलधारी मंडळी, युवक व युवतींनी मला विधानसभा निवडणुकीत साथ दिल्यास परिसराचा चेहरामोहर बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे वचन सचिन तावरे यांनी मेळाव्यात दिले.
सर्वसामावेशक उमेदवार..
च्गेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्या वेळी पक्षातील काही सहका:यांनी पाठीत खंजीर खुपसला.
च्त्यामुळे निसटता पराभव
झाला. त्यामुळेच पक्षाची उमेदवारी नाकारत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
च्पर्वती मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वाना बरोबर घेणार असून, उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा व सर्वसमावेशक उमेदवार म्हणून निवडणुकीला समोरे जाणार असल्याची
स्पष्ट भूमिका तावरे यांनी मेळाव्यात मांडली.