विकासकामात राजकारण नको
By Admin | Updated: January 6, 2015 23:07 IST2015-01-06T23:07:53+5:302015-01-06T23:07:53+5:30
विकासकामात राजकारण न करता गावाच्या विकासासाठी एकत्रित येणे काळाची गरज असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

विकासकामात राजकारण नको
केडगाव : विकासकामात राजकारण न करता गावाच्या विकासासाठी एकत्रित येणे काळाची गरज असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. दापोडी (ता. दौंड) येथे ‘संसद आदर्श ग्राम योजने’अंतर्गत विविध विकासकामांच्या आढावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
बारामती लोकसभा मतदारसंघात दापोडी हे गाव सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या माध्यमातून दत्तक घेतले आहे. दरम्यान, गावात विकासात्मक दृष्टिकोनातून झालेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आणि भविष्यात या गावाला विकासात्मकदृष्ट्या दिशा देण्याकरिता सुळे यांनी दापोडीला भेट दिली. या वेळी झालेल्या जाहीर सभेत त्या म्हणाल्या, ‘‘समाजाच्या हितासाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यांचा फायदा जनतेने करून घेणे गरजेचे आहे.’’माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघातून एकमेव दापोडी या गावाची निवड करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘‘गाव दत्तक योजनेअंतर्गत मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा दापोडीच्या ग्रामस्थांनी करून घ्यावा.
तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी विकासकामांचा आढावा घेतला. दापोडीचे ग्रामस्थ आणि जिल्हा दूध संघाचे संचालक रामभाऊ टुले यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्न मांडले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दापोडी गावाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला आमदार राहुल कुल, सभापती रोहिणी पवार, उपसभापती आशा डेंबळकर, सरपंच राजेंद्र नरुटे, उपसरपंच सीताराम देशमुख, अप्पासाहेब पवार, अॅड. अजित बलदोटा, राजेंद्र कोरेकर, सोहेल खान, गुरुमुख नारंग, हरेश रांभिया, वैशाली नागवडे, राणी शेळके, मंदाकिनी चव्हाण, वंदना मोहिते, मधुकर दोरगे, प्रवीण शिंदे, भाऊसाहेब ढमढेरे, अॅड. महेश खळदकर, महेश भागवत, नाना फडके, मधुकर दोरगे, किरण मोरे, मिलिंद मोरे, नवनीत जाधव, तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, विद्युत मंडळाचे हिरवाडकर, संगीता शिंदे, नारायण गुळमे, जगन्नाथ चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
४खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील अद्ययावत तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामाला भेट दिली. दरम्यान हे काम बंद पाडलेले पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गावाच्या हितासाठी तिसरी कुरकुंभ मोरी मंजूर झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी राज्य शासनाचा निधी दिला, मग काम कशासाठी थांबले, मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांना विचारले नगरपालिकेकडे तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे पैसे आले त्याचे काय झाले? तेव्हा मुख्याधिकारी म्हणाले, की ९ कोटी रुपये नगर परिषदेकडे आले असून, यापूर्वी दोन कोटी १८ लाख रुपये रेल्वे खात्याला दिले आहेत. ५० लाख सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेले आहेत. परंतु, पुढची जी रक्कम द्यायची आहे, त्या रकमेचा धनादेश तयार असून त्याच्यावर माझ्या सह्या झालेल्या आहेत; मात्र नगराध्यक्षांच्या सह्या झालेल्या नसल्याने धनादेश तसाच लिहून पडलेला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘या संदर्भात मी दौंडच्या नगराध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे.’’ असे सांगून त्या निघून गेल्या.