पीएमपी बंद पडल्याने खोळंबा
By Admin | Updated: January 23, 2017 02:44 IST2017-01-23T02:44:27+5:302017-01-23T02:44:27+5:30
सातारा रस्त्यावर भारती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारासमोर बीआरटी रस्त्यावर एक बस बंद पडल्यामुळे १०पेक्षा जास्त बस ट्रॅकमध्ये

पीएमपी बंद पडल्याने खोळंबा
पुणे : सातारा रस्त्यावर भारती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारासमोर बीआरटी रस्त्यावर एक बस बंद पडल्यामुळे १०पेक्षा जास्त बस ट्रॅकमध्ये अडकून पडल्या. शेकडो प्रवाशांचा या वेळी खोळंबा झाला.
शनिवारी (दि. २१) रात्री बीआरटी मार्गावरच कात्रज बसस्थानकाकडे जाणारी एक बस बंद पडल्याने या मार्गातील मागून येणाऱ्या १०-१२ बसेसला बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने बस व प्रवासी अडकून पडले.
बस लवकर दुरुस्त होईना. त्यातच लवकर घरी जाण्याची घाई, रिक्षा किंवा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध होत नसल्याने
शेकडो प्रवाशांना पायपीट करत घरचा रस्ता धरावा लागला. चालक-वाहक व उपस्थित
लांब जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवात जीव आला.(प्रतिनिधी)