शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘रिमोट’कंट्रोलने केला घात!; नीरा भीमा दुर्घटनेतील कामागारांचे मृतदेह पाठविले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 16:20 IST

नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या दुर्घटनेत आठजण मृत्युमुखी पडले असून ही घटना क्रेनचा वायरोप कंट्रोल करणाऱ्या रिमोटमध्ये बिघाड झाल्याने घडला असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देक्रेनचा वायरोप कंट्रोल करणाऱ्या रिमोटमध्ये बिघाड झाल्याने घडली घटना रात्री तीनच्या दरम्यान कामगारांच्या पत्याची चौकशी करून मृतदेह पाठवण्यात आले त्यांच्या गावी

विजय गायकवाडअकोले :  वेळ ५ वाजून ४० मिनिटे...२०० फूट खोली वरील बोगद्यातील ड्रीलिंगचे काम आटोपून घरी निघण्याची घाई...दिवसभर काम केल्याचे समाधान चेहऱ्यावर घेऊन वरून बकेट कधी खाली येणार याची वाट पाहत आठ जण वर निघण्याच्या तयारीत होते. बकेट खाली आले आणि आठजण त्यात बसले...बकेटचा वायरोपवर खेचत खेचत जमिनीवर घेऊन जाण्यासाठी सुरू झाला.. मात्र नियतीने या आठ जणांना त्यांच्या जीवनाचा अंत जवळ आल्याची जराही कुणकुण नव्हती.  चार ते तीन मिनिटातच बकेट वर आले आणि आठजणांना जमिनीवर सोडण्याऐवजी देवाघरी नेले.नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या दुर्घटनेत आठजण मृत्युमुखी पडले असून ही घटना क्रेनचा वायरोप कंट्रोल करणाऱ्या रिमोटमध्ये बिघाड झाल्याने घडली असल्याची माहिती मिळाली आहे. बोगद्यातून दोनशे फुटावरून निघालेला माल आणि कामगार खाली-वर नेण्यासाठी क्रेनच्या दोन बकेटचा वापर करण्यात येत होता. हे बकेट रिमोटच्या साह्याने कंट्रोल करण्यासाठी खाली आणि वरती एका सुपरवायझरची नेमणूक केली होती. मात्र संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोगद्यातून काम आटोपून कामगार वर येण्यासाठी आठजण बकेटमध्ये बसले, मात्र खालून वर येईपर्यंत घटना घडेल याची काहीच कल्पना कोणाला नव्हती. मात्र तो वायरोप तसाच स्पीडमध्ये वर खेचत गेला आणि ज्या ठिकाणी जमिनीवर थांबवायचा असतो त्या ठिकाणी वायरोप न थांबल्याने स्पीडमध्ये खालून आलेले बकेट वरील लोखंडी रॉडला जाऊन आदळले. वायरोप तुटून दोनशे फूट खोल बोगद्यात आदळले. यामध्ये असलेले आठ कामगार छिन्न विच्छिन्न खाली पडले.घटनेची माहिती समजताच अकोले परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र घटना झाल्यानंतर २० मिनिटात भिगवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरुवात झाली. पोलीस प्रशासन आणि बोगद्यावर काम करणारे कामगार यांच्या मदतीने तातडीने मृतदेह दुसऱ्या बकेटच्या साहाय्याने वर काढण्यात आले. एक तासाच्या आता मृतदेह वर काढून शवविच्छेदन करण्यासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या नंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली आणि रात्री तीनच्या दरम्यान कामगारांच्या पत्याची चौकशी करून मृतदेह रुग्णवाहिकेत त्यांच्या गावी पाठवण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू