राजगुरूनगरला दारूभट्या उद्धवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:45+5:302021-01-13T04:28:45+5:30

चिखलगाव परिसरात अवैध हातभट्टी दारू सर्रासपणे तयार करून विक्री केली जात होती. या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढला होता. खेड ...

Destroyed distilleries in Rajgurunagar | राजगुरूनगरला दारूभट्या उद्धवस्त

राजगुरूनगरला दारूभट्या उद्धवस्त

चिखलगाव परिसरात अवैध हातभट्टी दारू सर्रासपणे तयार करून विक्री केली जात होती. या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढला होता. खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्याकडे याबाबत तक्रारी आल्या होत्या. चिखलगावातील एका ओढ्याकाठी अवैध हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकत हातभट्टीसाठी लागणारा कच्चा माल उद्ध्वस्त केला. मानवी आरोग्यास घातक ठरणारे रसायन नष्ट करण्यात आले. या मोहीमेत पोलीस अंमलदार स्वप्नील गाढवे, सचिन जतकर, भगवान गिजरे, निखिल गिरीगोसावी, विशाल कोठावळे, प्रवीण गेंगजे यांनी कारवाई करून हातभट्टी दारु बनविणाऱ्या संबधिताना समज दिली.

फोटो ओळ: चिखलगाव ता. खेड येथे हातभट्टीवर पोलिसांनी छापा दारुचा कच्चा माल नष्ट केला.

Web Title: Destroyed distilleries in Rajgurunagar