गावांचे सर्वेक्षण होऊनही कळमोडी उपसा योजनेसाठी मान्यता नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:50+5:302021-09-02T04:23:50+5:30
पुणे : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील व थिटेवाडी बंधारा लाभक्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण झाले होते. मात्र, तरीदेखील कळमोडी उपसा योजनेसाठी ...

गावांचे सर्वेक्षण होऊनही कळमोडी उपसा योजनेसाठी मान्यता नाकारली
पुणे : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील व थिटेवाडी बंधारा लाभक्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण झाले होते. मात्र, तरीदेखील कळमोडी उपसा योजनेसाठी अंतिम मान्यता शासनाने नाकारली आहे. या भागातील शेतकरी न्यायासाठी येत्या (दि. ७) पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी दिली.
यासंदर्भात मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, विरोधी पक्षनेते, आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे निवेदने दिली आहेत. कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने २०१८ मध्ये पाच दिवस आझाद मैदानात आंदोलन केले होते. वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही तक्रार केली होती. परंतु, शासनाने अतिरिक्त क्षेत्राची मान्यताच नाकारली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील १६२५ हेक्टर आणि सातगाव पठार भागातील ३४४० हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडी उपसा योजना शासनाने १९९७ साली प्रस्तावित केली होती. नंतर खेड तालुक्याच्या पूर्व भागातील ८४३ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण झाले. जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थिटेवाडीपर्यंत २००० हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तसेच दोन वर्षांत पाणी येईल, अशी घोषणा केली होती.
कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीपराव चौधरी, उपाध्यक्ष राजू खंडीझोड, रामदास दौंडकर, सुभाष गोरडे, वसंतराव राऊत, उत्तम पवार, तुकाराम दौंडकर, संदेश साकोरे, विलासराव शिंदे, आकाश ढमाले यांनी सांगितले.
ReplyForward