शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:22 IST

- महाड हद्दीतील दुरुस्तीची कामे पूर्णत्वास; प्रशासनाच्या नियोजन अभावाचा स्थानिकांसह पर्यटकांना फटका

भोर : मागील पाच-सहा वर्षांत भोर-महाड मार्गावरील विविध प्रकारच्या कामांसाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंद का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. दरड प्रवण क्षेत्राचे कारण दिले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे पर्यटक, प्रवासी, नागरिक, व्यापारी सांगत आहेत.

भोर-महाड रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. महामार्गाच्या निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधी व्यतिरिक्त मागील चार वर्षांत भोर व महाड तालुक्यांत वरंधा घाट परिसरात झालेल्या जमीन खचण्याच्या कामांसाठीदेखील कोट्यवधी रुपयांचा खर्च तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला होता.त्या पश्चात हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला. महाड हद्दीमधील मार्गाची दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, भोर हद्दीमधील नवीन रस्त्याची कामे सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.१६ जूनच्या लेखी पत्राने जिल्हाधिकारी पुणे यांनी आगामी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या मार्गातून जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्याचा आदेश जाहीर केला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाकडून या कालावधीमध्ये रेड अथवा ऑरेंज अलर्ट नसेल तरच हलक्या गाड्यांना या मार्गावरून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

या बाबींचा विचार करता या परिसरामध्ये दरड प्रवण क्षेत्र असल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात दरड पडून रस्ता बंद होणे, रस्ता खचणे हे प्रकार फारसे घडत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाटाची पाहणी करून वाहतुकीस योग्य नसल्याचा अहवाल दरवर्षी दिला जातो आणी दर पावसाळ्यात तीन महिने घाट बंद असतो. हे मागील पाच ते सहा वर्षे सुरू आहे. पावसाळ्यात घाट बंद करून आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग व प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत? वरंधा घाट आता राष्ट्रीय महामार्गामध्ये गेला असतानासुद्धा त्यावर उपाययोजना करायची सोडून फक्त कागद पुढे करून जबाबदारी ढकलायचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदेवाडी-भोर महाड भोर हद्दीपर्यंतच्या ८१ किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ७२३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर महाड तालुक्यात हद्दीसाठी कोट्यवधी रुपये निधी मंजूर केला असतानाही प्रतिवर्षी वरंधा घाट बंद कशासाठी? घाट रस्ता सुरू राहावा आणि प्रवास सुलभ व्हावा म्हणून हा निधी खर्च केला असेल तर मग घाट बंद का? वरंधा घाटात कुठेही रुंदीकरणाचे काम सुरू नाही.

नाहक त्रासभोर तालुक्यात देवघर ते वारवंडपर्यंत नवीन काम सुरू आहे. प्रशासनाकडून मात्र लोकांना कसा मानसिक त्रास होईल आणि महाबळेश्वरमार्गे पुणे अथवा ताम्हिणीमार्गे पुणे म्हणजे लोकांना फक्त नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड कसा होईल, असा विचार करत असावेत, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

उदरनिर्वाहाचा प्रश्नभोर-महाड रस्ता बंद असल्यामुळे भाजीपाला, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद आहेत, पर्यटक येत नाहीत, व्यावसायिक गाड्या जात नाहीत. त्यामुळे सदर रस्त्यावरील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हाॅटेल व्यावसायिकांना धंदा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे उबार्डे येथील हाॅटेल व्यावसायिक प्रकाश पवार यांनी सांगितले.

 प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना न करता दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंदीमुळे भोर व कोकणातील नागरिकांना मोठा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने तसेच संबंधित राष्ट्रीय महामार्ग व बांधकाम विभागाने याचा लेखी खुलासा द्यावा. - सचिन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड