शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत कोट्यवधी खर्च करूनही प्रश्न गंभीरच, समस्या ‘जैसे थे’च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 03:36 IST

पुणे : पुणे शहराच्या खऱ्या अर्थाने जीवनवाहिन्या असलेल्या मुळा-मुठा नदीसह शहराच्या सौंदर्यात भर घालणारे कात्रज, पाषाण तलाव जलपर्णीच्या वाढत्या ...

पुणे : पुणे शहराच्या खऱ्या अर्थाने जीवनवाहिन्या असलेल्या मुळा-मुठा नदीसह शहराच्या सौंदर्यात भर घालणारे कात्रज, पाषाण तलाव जलपर्णीच्या वाढत्या साम्राज्यामुळे मरणासन्न झाल्या आहेत. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तब्बल साडेतीन कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, आजही ही समस्या कायम असून, खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.महापालिकेकडून शहरातील नदी, नाले व तलावांच्या स्वच्छतेसाठी व दर तीन-चार महिन्यांनी निर्माण होणाºया जलपर्णी काढण्यासाठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते.शहरातील मुळा-मुळा नदी आणि पाषण, कात्रज तलावतील जलपर्णी काढण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये दर वर्षी ६० ते ६५ लाख रुपयांची तरतूद केली जाते. जलपर्णी काढण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दर वर्षीनिविदा प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानंतर संबंधित ठेकेदार कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर न करता मॅन्युअली जलपर्णी काढण्याचे काम केले जाते.तसेच नदी, तलावांमध्ये थेट मोठ्या प्रमाणात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाही. यामुळे जलपर्णी काढल्यानंतर देखील काहीचदिवसांत पुन्हा जलपर्णीचे साम्राज्य उभे राहात असल्याची वस्तूस्थितीआहे. त्यामुळे महापालिकेने केलेला खर्च वाया जातो. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत.महापालिकाप्रशासन उदासीनजलपर्णीमुळे दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढत आहेत. याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जलपर्णी होऊ नये, म्हणून ठोस उपायांची गरज आहे. मात्र, त्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. ठोस उपाय योजून जलपर्णीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.जलपर्णीमुळे जलचरांचे अस्तित्व संपुष्टातमुळा-मुठा नदी व कात्रज, पाषाण तालावांच्या पाण्याच्या प्रदूषणामध्ये दिवेसंदिवस वाढ होत असून, जलपर्णीची समस्या वाढतच आहे.पाण्यावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यात आॅक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत बाधा येत असून, पुरेसा सूर्यप्रकाशदेखील मिळत नाही. यामुळे पाण्यात असलेले जलचरांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे