लॉकडाऊन असतानाही १३ हजार पुणेकरांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:45+5:302021-04-11T04:11:45+5:30
पुणे : शहरात अपुऱ्या लसींमुळे शनिवारीसुद्धा ३८ केंद्र बंद ठेवण्यात आली होती. पालिकेने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू ...

लॉकडाऊन असतानाही १३ हजार पुणेकरांनी घेतली लस
पुणे : शहरात अपुऱ्या लसींमुळे शनिवारीसुद्धा ३८ केंद्र बंद ठेवण्यात आली होती. पालिकेने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शनिवारी लॉकडाऊन असतानाही १३ हजार ७७६ पुणेकरांनी लस घेतली.
महापालिकेच्या प्रयत्नातून शहरात शासकीय आणि खासगी अशा एकूण १३० केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. लसीकरणाचा वेग आद्यपही वाढलेला नाही. मागील आठवड्यापासून का वेग आणखी कमी झाला आहे. पालिकेला मागणीनुसार लसींचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. पालिकेला शुक्रवारी रात्री लसींचे ३० हजार डोस उपलब्ध झाले. तर, यापूर्वीचे १३ हजार ५०० डोस शिल्लक होते. नियोजित केंद्रांपैकी ३८ केंद्रांवर लसीचा पुरवठा होऊ शकला नाही.
------
कोणत्या केंद्र सुरू आणि बंद आहेत?, किती लस उपलब्ध आहे याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांना लॉकडाऊनमध्ये हेलपाटे मारावे लागले.