महापालिकेच्या ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार

By Admin | Updated: September 7, 2016 01:53 IST2016-09-07T01:53:01+5:302016-09-07T01:53:01+5:30

महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांच्या प्रारूप रचनेला अंतिम स्वरूप दिले आहे. हा प्रारूप रचनेचा आराखडा बुधवारी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी

Design format of 41 wards of municipal corporation | महापालिकेच्या ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार

महापालिकेच्या ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार

पुणे : महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांच्या प्रारूप रचनेला अंतिम स्वरूप दिले आहे. हा प्रारूप रचनेचा आराखडा बुधवारी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीकडे सादर केला जाणार आहे.
राज्य शासनाने आगामी महापालिका निवडणूक ४ सदस्यीय प्रभागानुसार घेण्याचा निर्णय आहे. त्यानुसार प्रभागरचनेचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले.
महापालिकेतील नगरसेवकांच्या सध्या असलेल्या १५२ च्या
संख्येत १० ने वाढ झाली असून,
१६२ जागांकरिता निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ४ सदस्यांचे ३९ व ३ सदस्यांचे २ असे एकूण ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे.
प्रभाग रचनेला उत्तर दिशेकडून सुरूवात करण्यात येऊन, त्यानंतर पूर्व वळावे लागणार आहे. पूर्वेकडून पश्चिमेकड आणि शेवट दक्षिण दिशेला करण्यात यावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील याची पुरेपुर काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वस्त्यांचे दोन वेगवेगळ्या प्रभागात विभाजन होणार नाही.
विशेषत: अनुसूचित जाती व जमातींच्या वस्त्यांचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल या नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे दोन
प्रभागात विभाजन होणार नाही
याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रगणक गट शक्यतो फोडू नये आदी सूचना आयोगाने केल्या आहेत. प्रभागाची प्रारूप रचना करताना या नियमांचे पालन झाले नसल्याचे आढळून आल्यास याविरुद्ध १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान हरकती नोंदविता येणार आहेत.

Web Title: Design format of 41 wards of municipal corporation