तेढ निर्माण करण्यासाठी देसाईनेच कट रचला !
By Admin | Updated: October 28, 2014 01:19 IST2014-10-28T01:19:29+5:302014-10-28T01:19:29+5:30
हडपसर येथील संगणक अभियंता मोहसीन शेख यांचा खून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या कटकारस्थानाचा भाग होता.

तेढ निर्माण करण्यासाठी देसाईनेच कट रचला !
पुणो : हडपसर येथील संगणक अभियंता मोहसीन शेख यांचा खून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या कटकारस्थानाचा भाग होता. हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईच त्याचा मुख्य सुत्रधार असल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला़ अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज़े पी़ उत्पात यांच्या न्यायालयात निकम यांनी देसाईसह अन्य आरोपींचा जामीन फेटाळण्याची मागणी केली़ जामीन अर्जावर 31 ऑक्टोबरला निर्णय देण्यात येणार आह़े
महापुरुषांच्या छायाचित्रंच्या अवमानावरून हडपसर येथे दंगल भडकली होती़ त्यानंतर रात्री घरी जात असताना मोहसीन शेख यांचा खून झाला. याप्रकरणी पुणो पोलिसांनी धनंजय देसाई व त्याच्या साथीदारांना अटक केली आह़े पोलिसांनी आरोपपत्र पत्र दाखल केले आह़े
देसाई हा मोहसीन शेख प्रकरणातील मुख्य सुत्रधार असून त्याने प्रक्षोभक भाषणो करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा कट रचला होता़ ते हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असून त्यांनी एका निष्पापाचा खून केला आह़े त्यामुळे त्यांना जामिनावर सोडल्यास ते पुन्हा असे कृत्य करण्याची शक्यता आह़े त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी अॅड़ निकम यांनी केली़(प्रतिनिधी)