उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:35+5:302021-04-25T04:10:35+5:30

काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात घेण्यात आलेल्या अँटिजेन तपासणीमध्ये २३७ पैकी ५४ जण पाँझिटिव्ह रुग्ण आढळून ...

In the Deputy Chief Minister's Katewadi | उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत

उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत

काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात घेण्यात आलेल्या अँटिजेन तपासणीमध्ये २३७ पैकी ५४ जण पाँझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत काटेवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्राथमिक शाळेच्या आवारात हॉटपॉट सर्वे सह अँटिजेन टेस्टच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्वेक्षण करून काटेवाडी कन्हेरी, पिंपळी, लिमटेकसह इतर गावांतील झालेल्या रॅपिड चाचण्यांमध्ये २३७ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मार्तंड जोरी यांनी दिली.

सकाळी दहा वाजता सुरू झालेली चाचणी दुपारी अडीच वाजता संपली. आजच्या कॅम्पमध्ये एकूण २३७ व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काटेवाडी गावातील पॉझिटिव्ह संख्या १९, ढेकळवाडी ७, कन्हेरी चार व इतर गावांतील २४ रुग्णांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सरपंच विद्याधर काटे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. कॅम्प यशस्वी होण्यासाठी उपसंरपच समीर मुलाणी, धीरज घुले, श्रीधर घुले, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोइटे, धंनजय काळे, आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत प्रशासन अदींनी सहकार्य केले.

ग्रामपंचायत काटेवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्राथमिक शाळेच्या आवारात हॉटपॉट सर्वेसह अँटिजेन टेस्टच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

२४०४२०२१ बारामती—१५

——————————

Web Title: In the Deputy Chief Minister's Katewadi