शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीने फेकली शाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 20:51 IST

पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडला या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी केला हा प्रकार

पुणे : पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले आहे. यामुळे पुणे महापालिका आणि भाजपच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुण्यात महापौरांच्या कार्यालयात शाई फेकल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.  

''प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला असल्याचे कार्यकर्ते यावेळी म्हणाले आहेत.'' 

आम्ही महापौरांच्या अंगावर शाई फेकणार होतो 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. परंतु पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक तुकडा खाली पडला.  याला जबाबदार महापालिका आयुक्त आणि महापौर आहेत. आम्ही त्यांच्याच अंगावर शाई फेकण्यासाठी आलो होतो. पण ते कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालयातच शाई फेकून निषेध नोंदवला आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात; राष्ट्रवादीनेही केली टीका 

भाजपने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.  

टॅग्स :MayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदी