कर भरण्यात उदासीनता

By Admin | Updated: May 23, 2016 02:10 IST2016-05-23T02:10:43+5:302016-05-23T02:10:43+5:30

शहरामध्ये मोबाइल कंपन्यांकडून हजारो टॉवरची उभारणी करून त्याचा मिळकतकरच भरला जात नसल्याने महापालिकेने टॉवरसाठी जागा भाड्याने देणाऱ्या १ हजार ८०० घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

Depression to pay taxes | कर भरण्यात उदासीनता

कर भरण्यात उदासीनता

पुणे : शहरामध्ये मोबाइल कंपन्यांकडून हजारो टॉवरची उभारणी करून त्याचा मिळकतकरच भरला जात नसल्याने महापालिकेने टॉवरसाठी जागा भाड्याने देणाऱ्या १ हजार ८०० घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, यापैकी एकाही जागामालकाने अद्याप मिळकतकर भरलेला नाही. त्यामुळे पालिका त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून विचारला जात आहे.
शहरात एकूण २ हजार ४४५ मोबाइल टॉवर आहेत. त्यांपैकी केवळ १५२ मोबाइल टॉवर अधिकृतपणे परवानगी घेऊन उभारण्यात आले आहेत. उर्वरित २ हजार ३०२ मोबाइल टॉवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे मिळकतकराची ३०० कोटीपेक्षा जास्त रकमेची थकबाकी आहे.
मोबाइल कंपन्यांना ही थकबाकी भरण्यास सांगितले असता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्याला स्थगिती आणली आहे. मात्र पालिकेने मोबाइल टॉवरच्या मिळकतकराची वसुली मोबाइल कंपन्यांकडून न करता जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकाकडून वसूल करावी, असा अभिप्राय विधी विभागाकडून देण्यात आला.
मिळकतकर विभागाने त्यानुसार शहरातील १ हजार ८०० घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र अद्याप एकाही घरमालकाने मिळकतकराची थकबाकी भरलेली नाही. घरमालकांना नोटिशीनुसार दिलेली मुदत संपली आहे. त्यानुसार पालिकेने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य नागरिकांनी मिळकतकर न भरल्यास त्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून वसुलीची कारवाई पालिकेकडून केली जाते, तर कोट्यवधींचा मिळकतकर न थकविणाऱ्या मोबाइल कंपन्यांवर पालिकेची मेहरनजर का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून केला जात आहे.

Web Title: Depression to pay taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.