शिष्यवृत्तीची रक्कम होणार बँकेत जमा
By Admin | Updated: November 14, 2016 02:09 IST2016-11-14T02:09:04+5:302016-11-14T02:09:04+5:30
सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे खातेक्रमांक वेळेत प्राप्त करण्याकरिता एकात्मिक आदिवासी

शिष्यवृत्तीची रक्कम होणार बँकेत जमा
मंचर : सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे खातेक्रमांक वेळेत प्राप्त करण्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या वतीने मंगळवारी शिबिराचे आयोजन केले असून, खातेक्रमांक तत्काळ द्या, असे आवाहन आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय घिसे व सरचिटणीस सुनील भेके यांनी दिली.
शिष्यवृत्तीचे वाटप तातडीने करण्याची मागणी शिक्षक संघाच्या वतीने प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
परंतु आदिवासी विकास विभागाच्या ११ मार्च २0१६ च्या परिपत्रकानुसार सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाने शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांचे खातेक्रमांक उपलब्ध नसल्यास त्यांच्या पालकांचे खाते क्रमांक नमूद करावेत, असे आवाहन आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी नवनाथ भवारी यांनी मुख्याध्यापकांना केले आहे. (वार्ताहर)