शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर माऊलींचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 09:14 IST

टाळांचा गजर व मृदंगाच्या निनादात अलंकापुरी दुमदुमली

ठळक मुद्देरात्री समाजआरती झाल्यानंतर पालखी आजोळघरी मुक्कामी गेली असून १८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम आळंदीतच राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव(जि.पुणे) : मोजके वारकरी आणि टाळकरी असले तरी आकाशाला गवसणी घालणारा टाळमृदंगाचा खणखणाट आणि ‘ज्ञानोबा ज्ञानोबा’च्या जयघोषासह उत्साहपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. यंदाचे पालखी सोहळ्याचे १९० वे वर्ष आहे.

पहटेपासून उत्साहप्रस्थान सोहळ्याला शुक्रवारी पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. त्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. विणामंडपात सकाळी दहानंतर ह.भ.प. भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविण्यात आला. सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली.   ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. सोहळ्यासाठी मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना मंदिरात प्रवेश देण्यात आला. मानाचे दोन्ही अश्व मंदिरात आणून प्रदक्षिणा घालण्यात आली. माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले. रात्री समाजआरती झाल्यानंतर पालखी आजोळघरी मुक्कामी गेली असून १८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम आळंदीतच राहणार आहे.

३७ वारकरी पॉझिटिव्हसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुकांची शुक्रवारी प्रस्थान ठेवले. या पार्श्वभूमीवर निमंत्रित ३०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल ३७ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPuneपुणे