विभागनिहाय तरतुदी भाग ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:41+5:302021-02-05T05:17:41+5:30
* पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे महानगर परिवहन महामंडळाकरिता सन २०२१-२२ करिता ३८७ कोटी ६७ लाख रूपयांची तरतूद आहे़ ...

विभागनिहाय तरतुदी भाग ३
* पुणे महानगर परिवहन महामंडळ
पुणे महानगर परिवहन महामंडळाकरिता सन २०२१-२२ करिता ३८७ कोटी ६७ लाख रूपयांची तरतूद आहे़ यात १२ मी. बीआरटी, एसी इलेक्ट्रिक ३५० बसेस, जीसीसी तत्त्वावर व फेमच्या १५० बसेस घेण्याचे नियोजन आहे़
-------------------------
* उद्यान विभाग
शहरातील उद्यानासाठी भांडवली तरतूद ५४़ २० कोटी व महसुली तरतूद ५०़ ४५ कोटी अशी १०४ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ यात कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय विकसित करणे, सारसबाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करणे आदी योजनांचा समावेश आहे़
--------------------
* विद्युत विभाग
या विभागासाठी भांडवली तरतूद २८़ ५६ कोटी व महसुली तरतूद १०५़ ५० कोटी अशी १३४ कोटी ६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ शहरातील प्रकाश व्यवस्थेमध्ये केंद्र शासनाच्या धोरणानुसार एलईडी दिवे बसविणे, शहरातील पथदिवे सक्षम व अद्ययावत करणे, महापालिकेच्या विविध वास्तूंमध्ये विद्युतविषयक कामे पूर्ण करणे याकरिता आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत़
-----------------
* भवन रचना
भवन रचना विभागासाठी भांडवली तरतूद ३४१़८१ कोटी व महसुली तरतूद ३५़४४ कोटी अशी ३७७़२५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़
यात कोथरूड येथे शिवसृष्टी उभारणे, बांलगंधर्व रंगमदिर पुनर्निमाण करणे आदी कामांचा समावेश आहे़
------------
वरिल सर्व विभागांसह प्राथमिक विभागासाठी ३८४ कोटी ३७ लाख व माध्यमिक शिक्षणासाठी ७१ कोटी ७२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ याचबरोबर माहिती व तंत्रज्ञान विभागाकरिता ४५ कोटी ९६ लाख, समाजविकास विभागासाठी १३८ कोटी २५ लाख तरतुदी करण्यात आल्या आहेत़
--------------------------