विभागनिहाय तरतूद भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:46+5:302021-02-05T05:17:46+5:30
* पाणीपुरवठा विभाग : पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजित १४१ झोनपैकी मार्च,२०२२ पर्यंत ५० झोन कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

विभागनिहाय तरतूद भाग १
* पाणीपुरवठा विभाग :
पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजित १४१ झोनपैकी मार्च,२०२२ पर्यंत ५० झोन कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण पाणीपुरवठ्यासाठी भांडवली तरतूद ५४१़ ३४ कोटी, तर महसुली ५९५़ ८७ कोटी अशी मिळून १ हजार १३७ कोटी रूपयांची तरतूद केली आहे़
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेतील प्रस्तावित ८२ टाक्यांपैकी ६५ साठवण टाक्या बांधण्याची कामे पूर्ण करणे़, ६०० किमी लांबीची नवीन वितरण व्यवस्था विकसित करणे व अंदाजे १़ ५ लाख पाणीमिटर बसविण्याचे उद्दिष्ट आहे.
-----------------
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे तसेच ७० किमी लांबीच्या मुख्य मलवाहिन्या टाकण्यासाठी १४८ कोटी रूपयांची तरतूद केली आहे़ याचबरोबर मैलापाणी गोळा करण्यासाठी १९६ किमी लांबीची मलवाहिनी टाकण्यासाठी २००़ ८० कोटी, अस्तित्वातील मलवाहिन्या दुरूस्त करण्यासाठी १६़ ८५ कोटी, मुख्य मलवाहिन्या विकसित करण्यासाठी १३२़ ५८ कोटी व ६ मैलापाणी शुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी १८३ कोटी अशा ५३३ कोटी २३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़
----------------------------
* मलनि:सारण
मलनि:सारण देखभाल दुरूस्ती विभागासाठी भांडवली तरतूद ४५४़ ३८ कोटी व महसुली २३०़ ८५ अशा ६८५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे़
तर मलनि:सारण देखभाल दुरूस्तीसाठी, नालेसफाईसाठी ५०़ ०५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ सन २०२१-२२ या अंदाजपत्रकाव्दारे पावसाळी लाईन साफसफाईचे काम मलनि:सारण देखभाल व दुरूस्ती विभागामार्फत करण्यात येणार आहे़
-------------------
* घनकचरा व्यवस्थापन
शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे तो उचलणे आदी कामांसाठी भांडवली तरतूद १४५.९५ कोटी व महसूली तरतूद ५५७़ ५० कोटी अशी ७०३ कोटी ४५ लाख रूपये तरतूद करण्यात आली आहे़
----------------------------------