विभागीय आयुक्तांचा ‘तास’

By Admin | Updated: January 22, 2015 23:34 IST2015-01-22T23:34:14+5:302015-01-22T23:34:14+5:30

‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त एस़ चोक्कलिंगम यांनी शेवाळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवी व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा पाठ घेतला़

Department Hours 'Hours' | विभागीय आयुक्तांचा ‘तास’

विभागीय आयुक्तांचा ‘तास’

पुणे : ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त एस़ चोक्कलिंगम यांनी शेवाळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवी व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा पाठ घेतला़
चोकलिंगम हे सकाळीच प्रार्थनेच्या वेळी शाळेत पोहोचले़ त्यानंतर त्यांनी सातवीच्या वर्गात पाचअंकी गुणाकारांची ६ गणिते घातली़ मुलांनी सोडविलेली गणिते त्यांनी स्वत: त्यांच्या जागेवर जाऊन पाहिली़ त्यानंतर दुसरीच्या वर्गातील मुलांना स्वत:चे नाव लिहायला लावले़ मुलांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी ‘शालेय पोषण आहारा’ची पाहणी केली़ या वेळी गावातील माता-पालक सदस्यांची चर्चा करून शाळेला जाणवत असलेल्या समस्यांची माहिती घेतली़ शाळेच्या आठवीच्या वर्गाच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांना सांगितले़
या वेळी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, सरपंच मंगला कोद्रे, ग्रामपंचायत सदस्य अजित मोरे, सचिन शेवाळे, केंद्रप्रमुख रोहिणी धोडमिसे आदी उपस्थित होते़
मुख्याध्यापक चंद्रकांत जगताप यांनी परिपाठाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले़ पदवीधर शिक्षक विजय लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुधा मदन यांनी आभार मानले़

Web Title: Department Hours 'Hours'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.