वैद्यकीय उप केंद्रात गवताचे सम्राज पाण्याच्या टाकीत डेंग्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:28+5:302021-07-23T04:09:28+5:30
आलेगाव पागा मध्ये वैद्यकीय निवासस्थानी डॉक्टरांची उपलब्धता नसल्याच्या कारणास्तव येथील जनतेला जास्त त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आलेगावमध्ये ...

वैद्यकीय उप केंद्रात गवताचे सम्राज पाण्याच्या टाकीत डेंग्यू
आलेगाव पागा मध्ये वैद्यकीय निवासस्थानी डॉक्टरांची उपलब्धता नसल्याच्या कारणास्तव येथील जनतेला जास्त त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आलेगावमध्ये खाजगी कोणत्याही हॉस्पिटलची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना नावरे येथील वैद्यकीय उपचारासाठी जावे लागते, परंतु न्हावरा येथील सरकारी हॉस्पिटलला कोरोना सेंटर केल्यामुळे लोकांना न्हावरे जाणे सुद्धा अवघड होत आहे.
आरोग्य उपकेंद्र मध्ये कायमस्वरूपी एक डॉक्टर निवास स्थानी असेल तर लोकांच्या दैनंदिन जीवनातील येणाऱ्या समस्यांना मार्ग काढता येईल.
सरकारी उपकेंद्रांमध्ये जर ही परिस्थिती असेल तर पूर्ण गावांमध्ये कसे वातावरण असेल याची नोंद नोंदवहीमध्ये करणे आवश्यक आहे.
उपकेंद्रांमध्ये गवत गुडघ्या पर्यंत वाढलेले आहेत. या गवतामध्ये साप असल्याने या भागात नागरिक जाण्यास घाबरत आहे. पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाक्या स्वच्छ केल्या नाहीत. उपकेंद्राच्या पाठीमागील बाजूस जो टॅंक उभा केला आहे त्यामध्ये अनेक दिवसांपासून पाणी साठवून ठेवल्याने त्यामध्ये डेंग्यूचे डास व अंडी आढळले आहेत.
--
चौकट
आयुष्यमान भारत या योजनेमध्ये उपकेंद्र भरपूर सरकारी अनुदान मिळाले त्या अनुदानातून सुख सुविधा तयार करण्याचे काम आरोग्य केंद्रांमध्ये झालेले आहे परंतु त्याचा कोणताही उपयोग सर्वसामान्यांना होताना दिसत नाही.
वैद्यकीय सुविधाचा अभाव असल्याने रोज दहा पाच पेशंट येऊन माघारी जातात हॉस्पिटल हे उघडे नसते. या बाबत मागणी
उपसरपंच अशोक दादा भोसले
माजी सरपंच सतीश आरवडे
ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी
कृषी मित्र दत्ताभाऊ जांभळकर कालिदास हरिहर उपस्थित होते .