डेंग्यूचे 20 नवीन रुग्ण आढळले
By Admin | Updated: September 17, 2014 00:16 IST2014-09-17T00:16:13+5:302014-09-17T00:16:13+5:30
शहरात डेंग्यूची लागण झालेले दोन हजारहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने शहरात सुरू केलेल्या तपासणी मोहिमेनंतर शहरातील डेंग्यूचे विदारक वास्तव समोर येऊ लागले आहे.

डेंग्यूचे 20 नवीन रुग्ण आढळले
पुणो : शहरात डेंग्यूची लागण झालेले दोन हजारहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने शहरात सुरू केलेल्या तपासणी मोहिमेनंतर शहरातील डेंग्यूचे विदारक वास्तव समोर येऊ लागले आहे.
गेल्या तीन दिवसांत महापालिकेने राबविलेल्या तपासणी मोहिमेनंतर तब्बल 250 जणांना पाणी साठल्याने तसेच डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आल्याने नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच 15हून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या कीटक प्रतिबंधात्मक विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभरात सुमारे 20 नवीन डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, या महिन्यातील रुग्णांची संख्या 208 वर पोहोचली आहे. नोटीस बजावलेल्यांमध्ये खासगी सोसायटय़ा, मोठी बांधकामे, शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था, परिवहन संस्थांचा समावेश आहे. तसेच, काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात डासांची पैदास आढळल्याने 10 ते 12 जणांकडून दंडही वसूल करण्यात आल्याचे डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
गेल्या तीन महिन्यांतील डेंग्यूच्या रुग्णांची स्थिती
महिना डेंग्यू झालेले रुग्ण
जुलै630
ऑगस्ट591
सप्टेंबर517