शहरात वाढतोय डेंग्यूचा विळखा
By Admin | Updated: September 14, 2014 00:03 IST2014-09-14T00:03:28+5:302014-09-14T00:03:28+5:30
गेल्या आठवडाभरात या आजाराची लागण तब्बल 213 जणांना झाली आहे.

शहरात वाढतोय डेंग्यूचा विळखा
पुणो : शहरातील डेंग्यूची साथ रोखण्यासाठी महापालिकेने कडक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली असली, तरी गेल्या आठवडाभरात या आजाराची लागण तब्बल 213 जणांना झाली आहे. आज दिवसभरात डेंग्यूची लागण झालेले 32 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या सहा महिन्यांत शहरात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2क्77 वर पोहोचली आहे, तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ात ही रुग्णांची संख्या 466 वर पोहोचली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या पावसामुळे ठिकठिकाणी डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणावर डास निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी ओलावा असेल तेथे या डासांची उत्पत्ती होते. हे डास नागरिकांना चावले की प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो. या आजारामुळे रुग्णाला त्वरित उपचार न मिळाल्यास तो दगावू शकतो. (प्रतिनिधी)
4घरातील पाणीसाठय़ाच्या पृष्ठभागाला एडिस डासाची अंडी चिकटलेली असल्याने पाण्याच्या संपर्कात आल्यास डासांची पैदास होते. या डासांची पैदास झाल्यास डेंग्यू आजार होतो. त्यामुळे नागरिकांनी घरात जास्त वेळ पाणी साठू देऊ नये. तसेच, कुंडीमध्ये पाणी साठू देऊ नये, फ्रीज व एअर कंडीशन यांच्या मागील ट्रेमधील पाणी सतत बदलावे, छपरातील पाण्याची जाळी सतत तपासावी त्यात पाणी साठू देऊ नये, ड्रम, बॅरेल, कॅन यांना झाकण लावावे, पाणी सतत वाहते ठेवणो, भंगार साहित्य टेरेस व इतर परिसरात ठेवू नये, टाकी, हौद, रांजण यांना नेहमी झाकण लावावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
डास आढळणा:या ठिकाणांना भेटी
4दरम्यान, पालिकेच्या वतीने डेंग्यूचे डास आढळणा:या ठिकाणांना भेटी दिल्या जात आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दिवसेंदिवस शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ज्या परिसरात डेंग्यूचा रुग्ण आढळेल, त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे.