शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

महापालिका सभागृहनेते भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 9:11 PM

महापालिकेच्या २१ मे रोजी झालेल्या सभेत फ्रॉड हा शब्द उच्चारल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

ठळक मुद्देपालिकेतील वक्तव्य प्रकरण:  अरविंद शिंदे यांचा दावा

पुणे : महापालिका मुख्यसभेत केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या विरोधात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी मानहानी आणि अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. भिमाले यांच्याविरोधात शिंदे यांनी २३ मे रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. महापालिकेच्या २१ मे रोजी झालेल्या सभेत भिमाले यांनी शिंदे यांना फ्रॉड हा शब्द वापरल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. लिकेतील अधिकारी किशोर पडळ हे भिमाले यांच्या कार्यालयात वेळेत न आल्याबद्दल त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्या अधिका-याने पाच मे रोजी तक्रारही दाखल केली होती. पुणे महापालिकेच्या अधिका-यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करणा-यांवर कारवाईची मागणी या सभेत केली होती. या वेळी भिमाले हे चिडले आणि त्यांनी माझ्या बद्दल अपशब्द वापरले. अरविंद शिंदे हा फ्रॉड असून, तो लोकांना ब्लॅकमेल करतो, असे आरोप भिमाले यांनी या सर्वसाधारण सभेत केले होते. नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकार यांच्यासमोर भिमाले यांनी ही वाक्ये उच्चारली आहेत, असे शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  दरम्यान याप्रकरणी दिवाणी न्यायालयात २५ कोटी रुपयांचा मानहानी व अब्रुनुकसानीचा स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती शिंदे यांचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. शिंदे यांच्यावतीने अ‍ॅड. ठोंबरे, अ‍ॅड. जयपाल पाटील यांनी काम पाहिले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShrinath Bhimaleश्रीनाथ भिमालेCourtन्यायालय