खडकवासला येथील सेल्फी पॉइंटची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:45+5:302021-06-16T04:13:45+5:30

पुणे- पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी ...

Demolition of Selfie Point at Khadakwasla | खडकवासला येथील सेल्फी पॉइंटची तोडफोड

खडकवासला येथील सेल्फी पॉइंटची तोडफोड

पुणे- पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉइंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

आज मंगळवारी सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. दगड व इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंच यांचा नामफलक तोडण्यात आला होता.

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात सरपंच सौरभ मते व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आकर्षक विद्युत रोषणाई व धरणाच्या पाण्यात दिसणारे रंगीबेरंगी प्रतिबिंब यांमुळे खडकवासला धरणाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. मात्र काही समाजकंटकांनी केलेल्या तोडफोडीमुळे नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Web Title: Demolition of Selfie Point at Khadakwasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.