लोकशाही दिनाला अधिकार्‍यांची दांडी

By Admin | Updated: May 20, 2014 04:38 IST2014-05-20T04:38:59+5:302014-05-20T04:38:59+5:30

खेड तालुक्याच्या लोकशाही दिनाला आज बहुसंख्य अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचे आदेश खेडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांनी दिले

Democratic authorities | लोकशाही दिनाला अधिकार्‍यांची दांडी

लोकशाही दिनाला अधिकार्‍यांची दांडी

राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या लोकशाही दिनाला आज बहुसंख्य अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचे आदेश खेडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांनी दिले. दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी लोकशाही दिन असतो. शासनाच्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी या दिवशी उपस्थित राहून लोकांच्या सार्वजनिक व खासगी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ही व्यवस्था सुरू करण्यात आली. परंतु, हळूहळू अनेक अधिकारी या दिनाला गैरहजर राहू लागले. ‘लोकमत’ने याबाबतच्या बातम्याही प्रसिद्ध केलेल्या आहेत. आजही कोणी अधिकारी इकडे फिरकले नाहीत. ज्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन होतो ते उपविभागीय अधिकारी फक्त उपस्थित होते. त्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक पल्लवी पाटील, सहायक निबंधक हर्षित तावरे, महावितरणचे उपअभियंता राजीवन एन.व्ही. एवढेच अधिकारी उपस्थित झाले. या वेळी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे तालुकाध्यक्ष सुरेश टाकळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाचारणे, दक्षता समिती सदस्य सि.ल. आरुडे, बाळासाहेब चौधरी, गोविंद बुट्टे, अर्जुन मेदनकर, कुंडलिक कोहिनकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Democratic authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.