शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कर्णबधिरांच्या मागण्या कॅबिनेटसमोर मांडणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 13:26 IST

विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २५) राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने अपंग कल्याण आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी कर्णबधिरांवर लाठी हल्ला केला होता.

ठळक मुद्देअध्यादेश न काढल्यास निवडणुकांवर बहिष्काराचा दिव्यांगांचा इशारालोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकांवर देखील अध्यादेश निघेपर्यंत बहिष्कार टाकण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट

पुणे : कर्णबधिर व्यक्तींच्या शिक्षण आणि रोजगाराच्या मागण्यांचा विषय मंत्री समितीच्या (कॅबिनेट) बैठकीत मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिले. या मागण्यांचा अध्यादेश सरकारने न काढल्यास आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा आणि इतर निवडणुकांवर कर्णबधिर आणि त्यांचे कुटुंबिय बहिष्कार टाकतील, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. दिव्यांगांना महाविद्यलयीन, अभियांत्रिकीसह इतर उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करावी, त्यांच्यासाठी सांकेतिक तज्ज्ञाची नेमणुक केली जावी, त्यांचे रोजगाराचे प्रश्न सोडवावेत अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २५) राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने अपंग कल्याण आयुक्तालयावर मोर्चा काढला. त्या वेळी आंदोलकांनी पायी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी पोलिसांनी कर्णबधिरांवर लाठी हल्ला केला होता. पोलिसांच्या या असंवेदनशील कृत्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. अखेरीस, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले. तसेच, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी देखील निवेदन प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कर्णबधिर संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यस्तरीय कर्णबधीर संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत साळगावकर, महासचिव प्रदीप मोरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. तस्लिम शेख आणि अतिया हाजी यांनी सांकेतिक दुभाषक म्हणून काम पाहिले.मुख्यमंत्र्यांनी कर्णबधिर व्यक्तींच्या मागण्या ऐकूण घेतल्या. या मागण्या मंत्री समितीच्या बैठकीत ठेवण्याचे आश्वासन दिले. या मागण्यांचा अध्यादेशही लवकरात लवकर काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या बैठकीतील चर्चेतून आमच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, या मागण्यांबाबतचा अध्यादेश देखाल काढला जावा.लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकांवर देखील अध्यादेश निघेपर्यंत बहिष्कार टाकण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

---------आंदोलकांच्या प्रमुख मागण्या  - बीए, बीएससी, बीकॉम तसेच अभियांत्रिकी, नर्सिंग, फार्मसी, पॅरामेडिकल शिक्षणाची सुविधा निर्माण करुन सांकेतिक भाषातज्ज्ञाची नियुक्ती करावी -पहिली ते दहावी हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेचे सांकेतिक भाषा पुस्तक उपलब्ध करुन द्यावे -अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी लाटणाºयांवर कारवाई करावी - सांकेतिक भाषा डीग्री कोर्स करावा  -दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन न दिल्यास कायद्यानुसार बेरोजगार भत्ता सुरु करावा

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस