रेल्वे भाडेवाढ मागे घेण्याबाबत मागणी
By Admin | Updated: June 25, 2014 22:51 IST2014-06-25T22:51:25+5:302014-06-25T22:51:25+5:30
दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रेल्वे प्रवासी व मालभाडे वाढ मागे घेण्याबाबतचे निवेदन दौंड रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर. बी. सिंह यांना देण्यात आले.

रेल्वे भाडेवाढ मागे घेण्याबाबत मागणी
>दौंड : दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रेल्वे प्रवासी व मालभाडे वाढ मागे घेण्याबाबतचे निवेदन दौंड रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर. बी. सिंह यांना देण्यात आले.
भाजपाच्या केंद्रातील मोदी सरकारने पहिल्याच महिन्यात रेल्वेच्या प्रवासी व मालभाडे तिकिटामध्ये वाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दौंड हे मुख्य रेल्वे
जंक्शन असल्याकारणाने येथून मोठय़ा प्रमाणात नोकरदार वर्ग, विद्यार्थी, कामगार महिला ये-जा करतात. येथून रेल्वेने प्रवास करणो त्यांच्या दृष्टीने सहज आणि सुलभ ठरते.
असे असताना सरकारने जाहीर केलेल्या रेल्वे भाडेवाढीमुळे या लोकांचे अर्थकारण बिघडणार आहे. तरी ही जुलमी व अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्यात यावी, सदर भाडेवाढ पूर्णत: मागे घेण्यात न आल्यास कायदेशीर मार्गाने जनआंदोलन काँग्रेस पक्ष करील व त्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची असेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव ताकवणो, दौंड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष हरेश ओझा, सरचिटणीस अशोकराव जगदाळे, शहर युवकाध्यक्ष
अतुल जगदाळे, विवेक संसारे, दिलीप परदेशी, संपतराव फडके,
मालनबाई दोरगे, रफिकभाई
शेख, राबिया हयमनाबाद
यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी
मोठय़ा संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)