राडारोडा हटविण्याची मागणी

By Admin | Updated: May 10, 2017 04:04 IST2017-05-10T04:04:28+5:302017-05-10T04:04:28+5:30

येथील भोंडवे कॉर्नरलगत असणाऱ्या मुख्य चौकातील नैसर्गिक ओढ्यावरील पुलाचा संरक्षक कठडा बांधण्याकरिता खोदण्यात

Demand for withdrawal of Radaroda | राडारोडा हटविण्याची मागणी

राडारोडा हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : येथील भोंडवे कॉर्नरलगत असणाऱ्या मुख्य चौकातील नैसर्गिक ओढ्यावरील पुलाचा संरक्षक कठडा बांधण्याकरिता खोदण्यात आलेला राडारोडा रस्त्यावर टाकल्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भोंडवे कॉर्नर चौक ते बीआरटी मुख्य चौकाच्या रस्त्यालगत गेल्या दोन महिन्यांपासून पडलेला राडारोडा उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुलावरील कठड्याचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यालगत तब्बल दोन महिन्यांपासून राडारोडा पडून असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर राडारोडा ठेवणाऱ्या ठेकेदारांकडून महापालिकेने शुल्क आकारावे. रस्त्यावरील राडारोडा लवकरात लवकर उचलण्याची मागणी सातत्याने होत असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने येथील ओढ्यावर नवीन पूल बांधला. त्यामुळे रस्ता मोठा झाला. राडारोडा रस्त्यावर पडल्यामुळे वाहन घसरून अपघात होत आहेत.

Web Title: Demand for withdrawal of Radaroda