शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पाण्यावर श्वेत पत्रिका प्रसिध्द करण्याची मागणी : भाजपाचेच पदाधिकारी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:49 IST

जलसंपदा विभागाने स्वत:ची अकार्यक्षमता झाकण्यासाठी पुणेकरांचा पाणीपुरवठा पोलिस खात्याच्या मदतीने खंडित करणे हा नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांचा अपमान आहे. त्यामुळे एकतर महापालिकेनेच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अन्यथा...

ठळक मुद्देजलसंपदा विभाग व महापालिका यांच्यात रोज १ हजार १५० एमएलडी पाणी देण्याबाबत करार पुणे धरण क्षेत्रातील धरणांचा वापरण्यास योग्य पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी

पुणे : शहराला मिळणारे पाणी नक्की किती? पाटबंधारे खाते म्हणत आहेत तेवढे की महापालिका सांगते आहे तितकेच? याचा निकाल व्हावा व पुणेकरांच्या मनातील संभ्रम कायमचा निघावा यासाठी पुण्याच्या पाण्यावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्याच काही माजी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पाटबंधारे खाते महापालिकेला फसवते आहे. मागणी केलेला साठा देत नाही ही वस्तुस्थिती या श्वेतपत्रिकेद्वारे पुणेकरांच्या समोर येईल असे भाजपाचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर तसेच सुहास कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्याबाबत महापौरांना पत्रच लिहिले असून त्यात श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना केसकर म्हणाले, जलसंपदा विभाग व महापालिका यांच्यात रोज १ हजार १५० एमएलडी पाणी देण्याबाबत करार झाला तो सन २०१३ मध्ये. यातून माणशी १५० लिटर पाणी रोज मिळेल असे गृहित धरले गेले, मात्र त्याचवेळी खडकी कॅन्टोन्मेंट संरक्षण संपदा, विमानतळ, ससून व इतर मोठी हॉस्पिटल यांनाही महापालिकाच पाणी पुरवत आहे याचा विचारच झाला नाही.पुण्याची वाढती लोकसंख्या, नवीन समाविष्ट गावे, ५ किलोमीटर पर्यंतच्या परिघातील ग्रामपंचायतीला पाणी देण्याचे बंधन अशा सर्वच गोष्टींकडे पाटबंधारे खात्याने पूर्ण दुर्लक्ष केले, अजूनही करत आहेत. या सर्वांना पाणी द्यायचे तर १ हजार १५० एमएलडी पाणी पुरवणार नाही ही साधी गोष्ट आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करून पाटबंधारे विभाग महापालिकेवर पर्यायाने पुणेकरांवर टीका करत आहे असे मत केसकर यांनी व्यक्त केले. मुंढवा जॅकवेल मधील महापालिकेने शुद्धीकरण केलेले पाणी पाटबंधारे खात्याने घ्यावी व ते शेतीसाठी द्यावे, त्या बदल्यात तितकेच पाणी खडकवासला धरणामधून पुणे महापालिकेला द्यावे असाही करार झाला आहे, पण पाटबंधारे खाते पूर्ण क्षमतेने त्या प्रकल्पातून पाणी उचलतच नाही अशी टीका केसकर यांनी केली. केसकर व कुलकर्णी म्हणाले, ‘‘पुणे धरण क्षेत्रातील धरणांचा वापरण्यास योग्य पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी इतका असून, त्यापैकी ११. ५० टीएमसी पुणे महापालिकेला व उर्वरित १८.१० टीएमसी शेतीसाठी हे पाणी वाटपाचे सुत्र आहे, मात्र ते पुण्याची लोकसंख्या दुर्लक्षित करून तयार केलेले आहे. शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचे पैसे वसूल न करणाऱ्या जलसंपदा विभागाने स्वत:ची अकार्यक्षमता झाकण्यासाठी पुणेकरांचा पाणीपुरवठा पोलिस खात्याच्या मदतीने खंडित करणे हा नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांचा अपमान आहे.’’ त्यामुळे एकतर महापालिकेनेच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अन्यथा पुण्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हीच ती प्रसिद्ध करू असा इशाराही केसकर व कुलकर्णी यांनी दिला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी