शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी; पावसाने नसल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 21:20 IST

खडकवासलातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत....

भिगवण (पुणे) :खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी पाळी न मिळाल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर गेल्या आठ दिवसांपूर्वी सोडण्यात आलेले पाणी ७ दिवसांच्या आत बंद झाल्यामुळे ते शेताच्या ओठावरच नीट पोहोचू शकले नाही तर ते पोटाला कसे मिळणार याचा विचार पाटबंधारे विभागाने करण्याची आवश्यकता आहे. तसेच खडकवासलातूनइंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची शेतकरी मागणी करीत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, तर काही ठिकाणी पूर आल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, नेहमी पर्जन्यमान कमी असणाऱ्या इंदापूर तालुक्याला पावसाच्या रुसव्याप्रमाणेच प्रशासनाच्या फसव्या धोरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील बहुतेक तलाव आटून गेले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात काही दिवस रिमझिम बरसणाऱ्या धाराही बंद झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत नीचांकी पावसाची नोंद ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य पिके वाचली नाहीत तर अगदी चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच तलावासाठी संजीवनी ठरणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, तालुक्यातील तलाव भरण्याचे कोणतेही धोरण राबविले जात नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

भिगवण ग्रामीण विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीनुसार जूनमध्ये २९.६ मिलीमीटर, तर जुलै महिन्यात ६२.६ मिलीमीटर पाऊस पडला असल्याची माहिती आहे. ही गेल्या २५ वर्षांत २०१४ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पावसाची नोंद घेण्यात आल्याचे भिगवण ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देवीदास फलफले यांनी दिली. खडकवासला धरण साखळीत पुरेसा साठा असताना इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची आवश्यकता आहे. यातून शेतकरी चारा पीक घेऊ शकतो. मात्र, मान्सून संपून चालला असताना इंदापूर तालुक्यातील तलाव कोरडे असताना दोन्ही बाजूंचे राजकीय नेते गप्प आहेत, हे योग्य नाही.

नेहमी शेतकऱ्यांसाठी इंदापूर तालुक्यातील आजी- माजी आमदार तालुका पाणीदार व्हावा यासाठी झगडत असतात. मात्र, पावसाळा संपून चालला असताना तलाव भरण्यासाठी राजकीय भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मागील १५ दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, मागणी करताच शेतीसाठी सुरू असलेली पाळी ७ दिवसांत बंद करण्यात आली त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेला आहे.

- तुकाराम बंडगर, प्रगतिशील शेतकरी

टॅग्स :khadakwasala-acखडकवासलाIndapurइंदापूर