दौंड तालुक्यात टँकरची मागणी वाढली

By Admin | Updated: December 23, 2015 00:06 IST2015-12-23T00:06:16+5:302015-12-23T00:06:16+5:30

दौंड तालुक्याच्या जिरायत भागामध्ये ऐन हिवाळ््यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

Demand for tanker in Daund taluka increased | दौंड तालुक्यात टँकरची मागणी वाढली

दौंड तालुक्यात टँकरची मागणी वाढली

वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागामध्ये ऐन हिवाळ््यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे अनेक गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दौंड पंचायत समितीकडे दाखल केले आहेत.
तालुक्याच्या जिरायत भागातील नागरिकांना नेहमीच उन्हाळ््यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र यावर्षी ऐन हिवाळ््यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या डिसेंबर सुरू असून जून महिन्याशिवाय पावसाळा सुरू होणार नसल्याने अजून जवळपास सात महिने या भागातील ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागणार आहे.
जिरायत भागापाठोपाठ बागायत भागातील गावांमधूनही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने सोमवारपर्यंत (दि. २१) दौंड पंचायत समितीकडे वासुंदे, हिंगणीगाडा, कुसेगाव, खोर, कौठडी, लिंगाळी, मेरगळवाडी-मसनेरवाडी, रावणगाव, खडकी व बोरीबेल अशा एकूण १० गावांमधून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.
त्यातील वासुंदे, हिंगणीगाडा येथील टँकर प्रत्यक्षात सुरू झाले असून कुसेगावसाठी टँकर मंजूर झालेला आहे. उर्वरित ७ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव दौंड पंचायत समितीने मंजुरीसाठी तहसीलदार, प्रांत कार्यालय व जिल्हाधिकारी या वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवले असल्याची माहिती दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Demand for tanker in Daund taluka increased