शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कायम सेवेत घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 20:17 IST

समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देसमाविष्ट गावांचा प्रश्न : विकासकामे सुरू होण्याची गरजमहापालिकेत समाविष्ट करतानाच या सर्व गावांमधील ग्रामपंचायती विसर्जित गावांमध्ये मोठ्या वसाहती झाल्या असल्या तरी तिथे पायाभूत सुविधांचा अभाव

पुणे : समाविष्ट गावांमधील कर्मचारी अधिकारी यांना महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी या गावांच्या नजीकच्या भागातील नगरसेवकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहे, मात्र समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, लोहगांव, फुरसुंगी, उरुळी - देवाची, मुंढवा, साडेसतरानळी, उंड्री या ११ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.यासंबधीच्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयानेच तसा आदेश सरकारला दिला होता. महापालिकेत समाविष्ट करतानाच या सर्व गावांमधील ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या. त्यांच्याकडील कर्मचारी त्यामुळे महापालिकेत वर्ग झाले. सर्व गावांमध्ये मिळून ४०० कर्मचारी होते. ग्रामपंचायत दप्तरात नोंद होती, त्यांचा निर्णय लगेच झाला, उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत मात्र प्रशासनाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.त्यांना महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घ्यावे असा प्रस्ताव सचिन दोडके व अनिल टिंगरे या नगरसेवकांनी स्थायी समितीकडे दिला आहे. या कर्मचाऱ्यांना गावांची माहिती आहे. महापालिकेचे कायम कर्मचारी तिथे नियुक्त केले तर गावांची माहिती नसल्याने त्यांना तिथे कार्यक्षमतेने काम करता येणार नाही, त्यात अडचणी येतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचेच जे कर्मचारी होते, त्यांना तिथेच नियुक्त करावे असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. गावांमध्ये मोठ्या वसाहती झाल्या असल्या तरी तिथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे महापालिकेने तिथे त्वरीत विकासकामे सुरू करावीत अशीही मागणी या नगरसेवकांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारीgram panchayatग्राम पंचायत