पाबळ येथे लस पुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST2021-04-15T04:09:59+5:302021-04-15T04:09:59+5:30
मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर लसीकरण या केंद्रावर करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र येथील गर्दीला सामोरे जावे लागत ...

पाबळ येथे लस पुरवठा करण्याची मागणी
मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर लसीकरण या केंद्रावर करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना मात्र येथील गर्दीला सामोरे जावे लागत आहे. दररोज साधारण १५० डोस या लसीकरण केंद्रावर दिले जात आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून औषध विक्रेते, त्याचबरोबर डॉक्टर्स त्यांचे कर्मचारी त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सेवामध्ये असलेल्या ज्यांनी लस घेतलेले नाहीत या कर्मचाऱ्यांना देखील लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. ऑनलाइनला नोंदीची साईट बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना सध्या ही लस या केंद्रावर घेता येत नाही. ही साईट लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीदेखील अनेकांनी केले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझरचे वाटप पाबळचे सरपंच मारुती शेळके, माजी उपसरपंच सोपान जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
१४ शिक्रापूर
पाबळ येथील केंद्रावर लसीकरणासाठी झालेली गर्दी.