सूसगावा येथे जम्बो सेंटर सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:11 IST2021-04-27T04:11:05+5:302021-04-27T04:11:05+5:30

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट उग्र रूप धारण करत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण ...

Demand to start Jumbo Center at Susagawa | सूसगावा येथे जम्बो सेंटर सुरू करण्याची मागणी

सूसगावा येथे जम्बो सेंटर सुरू करण्याची मागणी

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट उग्र रूप धारण करत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. म्हणूनच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने माजी आमदार विनायक निम्हण यांनी त्यांच्या सूसगाव येथील सनीज वर्ल्ड रिसॉर्ट येथे शासनाने जम्बो कोविड सेंटर सुरू करावे, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली.

याठिकाणी पंचतारांकित सुविधा आहेत. येथील रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण मोफत देण्याची व्यवस्था रिसाॅर्ट करेल. सामाजिक भावनेतून रिसॉर्ट आम्ही कोविडसाठी वापरण्याकरिता देण्यास तयार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले आहे. सूसरोड येथील सनीज वर्ल्डमध्ये अठरा हजार स्क्वेअर फुटाचे दोन प्रशस्त हॉल, अनेक रुम्स, कॉटेजेस आहेत. पाणी, वीज, पंखे, संडास, बाथरूम, एसी रूम अशा सुविधा आहेत. तसेच परिसर अतिशय हवेशीर आहे. यामुळे शेकडो नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: Demand to start Jumbo Center at Susagawa