महापालिका इमारतीत इर्मजन्सी वैद्यकीय सुविधा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:54+5:302020-11-26T04:27:54+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यरत हजारो कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नित्याने ये-जा असलेल्या नागरिकांची संख्याही मोठ्या ...

महापालिका इमारतीत इर्मजन्सी वैद्यकीय सुविधा उभारण्याची मागणी
पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यरत हजारो कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नित्याने ये-जा असलेल्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे़ सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या सेवकास, अधिकाºयास अथवा आलेल्या नागरिकास अचानक चक्कर येणे, बीपी व शुगर कमी होणे व वाढण्याचे प्रमाण वारंवार घडत आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य इमारतीत इर्मजन्सी वैद्यकीय सुविधा (ओपीडी) उभारण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे़
महापालिका इमारतीत काही दिवसांपूर्वी एका सेवकास हृदयविकाराचा झटका आला होता़ मात्र रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ या घटनेबरोबर अनेकदा सेवकांना अथवा नागरिकांनी काही त्रास जाणवल्यास लागलीच औषधोपचार इमारतीत उपलब्ध होत नसल्याच्या वस्तुस्थितीचा अनुभव नुकताच प्रशासनाने घेतलेला आहे. अशा वेळी महापालिकेच्या इमारतीत इर्मजन्सीकरिता एखादी जुजबी उपचारासाठी तरी ओपीडी असणे आवश्यक असल्याचे बागुल यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे़
---------------------