‘क’ लिपिक पदाची दुसऱ्या प्रतीक्षा यादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:44+5:302020-12-06T04:10:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक या विभागाची ...

Demand for second waiting list for ‘C’ clerk post | ‘क’ लिपिक पदाची दुसऱ्या प्रतीक्षा यादीची मागणी

‘क’ लिपिक पदाची दुसऱ्या प्रतीक्षा यादीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक या विभागाची एकत्रित संयुक्त गट क परीक्षा २०१८ एकूण ९४९ पदांसाठी घेण्यात आली. यापैकी सर्व परीक्षेच्या निकालासह लिपिक या पदासाठीचा देखील अंतिम निकाल लावण्यात येऊन केवळ या पदासाठी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. या पदाची पुन्हा नव्याने दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

एमपीएससीने संयुक्त गट क पुर्व परीक्षा एकत्रित घेतली. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रत्येक पदानुसार मुख्यपरीक्षा घेतली. यातून अंतिम यादी निवडण्यात आली. या पैकी केवक लिपिक पदासाठी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली.

मात्र या यादीत कर सहायक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात निवड झालेल्या सुमारे ५९ विद्यार्थ्यांची नावे आली. या विद्यार्थ्यांची आधीच निवड झालेली असताना केवळ नियमामुळे पुन्हा त्यांची नावे प्रतीक्षा यादीत आली. त्यामुळे एमपीएससीने प्रतीक्षा यादी जाहीर करूनही ज्या विद्यार्थ्यांला गरज आहे. त्याला या निर्णयाचा फायदा झाला नाही. त्यामुळे निवड झालेल्या व नोकरीवर रुजू झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे काढून नव्याने प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

ही परीक्षा २०१८ मध्ये झाल्याने यासाठी मराठा आरक्षण लागू नाही. आयोगाने यावर त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. कोरोना आणि मराठा आरक्षणाच्या लढाईमुळे नवीन पदांची जाहिरात आली नाही. अथवा ज्या परीक्षा होणार आहेत. त्या झाल्या नाहीत. लिपिक पदाची प्रतिक्षा यादी जर नव्याने जाहीर केली तर अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळून त्यांना न्याय मिळेल. अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Demand for second waiting list for ‘C’ clerk post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.