कर्नावड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:46+5:302020-11-28T04:04:46+5:30
कर्नावड मार्गे चिखलगाव तसेच अंबावडे कोर्ले मार्गे रायरेश्वर हा रस्ता अतिशय खराब वेदनादायी झाला आहे तसेच तो असुरक्षित झाला ...

कर्नावड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
कर्नावड मार्गे चिखलगाव तसेच अंबावडे कोर्ले मार्गे रायरेश्वर हा रस्ता अतिशय खराब वेदनादायी झाला आहे तसेच तो असुरक्षित झाला आहे.रस्त्यातील अनेक ठिकाणी खड्डे पडून आणि रस्ता उखडून गेलेला आहे प्रवास करताना माणसांचे कंबरडे मोडते आणि गाडयाही खिळखिळया होत आहेत.अनेक लोकांना हा रस्ता खराब झाल्यामुळे शारीरिक आणि आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. भोरचा रोजगार असणारा पर्यटन माध्यमातून येणारे पर्यटक या रस्त्यामुळे नाराजी व्यक्त करत आहे.त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी दुरुस्त करावी आणि सुरक्षित बनवावा अशी मागणी केली आहे.